सुपरस्टार रजनीकांत याचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. साऊथमध्ये रजनीकांत यांना देव मानलं जातं. अशातच सोशल मीडियावर रजनीकांत याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सुपरस्टार रजनीकांत याचा साधेपणा दिसून येत आहे. समजा तुम्ही जर इकोनॉमी क्लासमधून विमानात प्रवास करत असाल आणि अचानक सुपरस्टार रजनीकांत समोर आला तर. असाच काहीचा किस्सा या प्रवाशांसोबत घडला आहे.