
Marathi Entertainment News : अभिनेता-गायक दिलजीत दोसांझ आणि गायक एपी ढिल्लनचा वाद सध्या चर्चेत आहे. दिलजीतने त्याला इंस्टाग्रामवर ब्लॉक केल्याचं दावा एपी ढिल्लनने केला होता. तेव्हा दिलजीतने त्यावर प्रतिक्रिया देत त्याने कधीच ब्लॉक केलं नाही असा खुलासा केला. त्यातच आता एका मराठी गायकाने विराट कोहलीने त्याला ब्लॉक केल्याचं म्हटलं. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.