Premier
Champions Trophy 2025 : मेडल मिळाल्यानंतर बायकोला कौतुकाने दाखवायला पोहोचला विराट; अनुष्काची प्रतिक्रिया होतेय व्हायरल
India Won Champions Trophy Anushka Viral Reaction : भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. मेडल मिळाल्यावर कौतुकाने दाखवायला गेलेल्या विराटला अनुष्काने दिलेली प्रतिक्रिया व्हायरल होतेय.
News : काल 9 मार्चला भारताने दुसऱ्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. न्यूझीलंडवर मात करत भारतीय क्रिकेट टीमने मॅच जिंकताच सगळीकडे जल्लोष करण्यात आला. त्यातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याबद्दल विराटला मेडल देण्यात आलं तेव्हा तो कौतूकाने अनुष्काला दाखवायला आला. तेव्हा तिने दिलेली प्रतिक्रिया व्हायरल होतेय.

