VISHAKHA SUBHEDAR’S SON RETURNS TO INDIA
esakal
VISHAKHA SUBHEDAR SON ABHINAY RETURNS HOME: मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय सुभेदार हा कुवेतमध्ये अडकला होता. लंडनला जात असताना त्याचं विमान कुवेतमध्ये उतरवण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांचा मुलगा कुवेतमध्ये एका हॉटेलात अडकला होता. दरम्यान अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत मुलाला मायदेशी परत आणण्यासाठी मदतीची विनंती केली होती. व्हिडिओची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुलाला परत आणण्याचं आश्वासन सुद्धा दिलं होतं.