

vithabai narayangaonkar real life story
esakal
विठाबाई नारायणगावकर हे नाव सध्या मराठीसोबतच हिंदी प्रेक्षकांच्यादेखील तोंडावर आहे. त्याचं कारण म्हणजे अभिनेत्री श्रद्धा कपूर हीचा 'ईठा' हा सिनेमा. यापूर्वी फक्त महाराष्ट्रातील मराठी रसिक प्रेक्षकांना ठाऊक असलेलं हे नाव आता देशपातळीवर चर्चिलं जातंय. 'विठाबाई नारायणगावकर' हे नाव घेतलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर तमाशाचा फड उभा राहतो आणि त्यात बिजलीसारख्या नाचणाऱ्या विठाबाई दिसतात. त्यांच्या कलेची दखल राज्य शासनानेदेखील घेतली होती. मात्र लहानपणापासून मेहनत करणाऱ्या विठाला लग्नानंतरही यातनाच सहन कराव्या लागल्या. त्यांचे पती त्यांना नीट नांदवत नव्हते, त्यांचा छळ करायचे असं स्वतः स्वतः विठाबाई यांनी एका मुलाखतीत सांगितलेलं.