
सामाजिकदृष्ट्या ज्वलंत विषयांवर आधारित चित्रपट बनवणारे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांची ओळख सत्याशी प्रामाणिक राहणाऱ्या सिनेनिर्मात्याप्रमाणे आहे. त्यांच्या चित्रपटांनी कायमच चर्चेला वाव दिला असून ‘द काश्मीर फाइल्स’ हा त्यांचा असाच एक चित्रपट, जो केवळ ब्लॉकबस्टर ठरला नाही, तर अनेकांच्या मनाला भिडला आणि भारतीय जनतेला एका कटू सत्याशी समोरासमोर आणून ठेवले.