
Marathi News : मराठी इंडस्ट्रीमधील ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं काल 19 जूनला निधन झालं. मृत्यूसमयी त्यांचं वय 74 वर्षं होतं. उत्तम अभिनेते, लेखक आणि संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने मराठी सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. विवेक लागू हे दिवंगत अभिनेत्री रीमा लागू यांचे पती होते.