
गेल्या काही वर्षात अनेक मराठी कलाकारांनी मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी घर घेतलं. त्यात छोट्या पडद्यावरील अनेक कलाकाराचा समावेश आहे. आता त्यात छोट्या पडद्यावरील आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याच्या नावाचा समावेश आहे. हा अभिनेता आहे विवेक सांगळे. विवेकने मुंबईतील लालबाग येथे घर घेतलं. आपल्या वडीलांची मिल असलेल्या ठिकाणीच त्याने घर घेतलंय. मुंबईत घर घेणं खूप अवघड असतानाच त्याने लालबाग सारख्या ठिकाणी घर घेतलं ही खूप मोठी गोष्ट आहे. यासगळ्या प्रवासात एका मराठी अभिनेत्री त्याला मदत केलीये.