
vivek sangle new home
esakal
लोकप्रिय मराठी अभिनेता विवेक सांगळे याने काही दिवसांपूर्वीच मुंबईतील लालबाग येथे नवीन घर घेतलं. त्याने या घराची वास्तुशांती अगदी धुमधडाक्यात केली होती. 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेत एंट्री झाल्यानंतर त्याने घराची गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. त्याचं घर नेमकं कसं आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक होते. आता विवेकने त्याचं घर आतून कसं आहे हे चाहत्यांना दाखवलं आहे. विवेकने हे घर अतिशय सुंदर पद्धतीने सजावलंय.
vivek sangle new house
esakal