
Wagle Ki Duniya Serial : सोनी सबवरील वागले कि दुनिया ही मालिका खूप गाजतेय. सामान्य माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी आणि त्यावर विनोदी ढंगाने भाष्य करणारी ही मालिका अनेकांना आवडते. या मालिकेतील प्रत्येक पात्र सोशल मीडियावर सुपरहिट आहे. यातीलच सगळ्यांचं आवडतं पात्र म्हणजे सखी वागले. अभिनेत्री चिन्मयी साळवी ही भूमिका साकारते. नुकतंच चिन्मयीबद्दलच्या एका पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
आज २८ जुलैला चिन्मयीचा वाढदिवस आहे. यानिमित्त सगळेचजण तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. यावेळी अभिनेता आयुष संजीवने केलेल्या पोस्टची चर्चा सगळीकडे होतेय. आयुषने चिन्मयीबरोबरच फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. "Happy birthday to the pink of all my greys" (माझ्या ग्रे आयुष्यातील गुलाबी व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसाच्या शुभेच्छा) अशी पोस्ट आयुषने लिहिली आहे. अनेकांनी कमेंट करत चिन्मयीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या पोस्ट नंतर ते दोघे डेट करत असल्याची चर्चाही सोशल मीडियावर रंगू लागली आहे. पण ते खरंच रिलेशनशिपमध्ये आहेत का याबाबत निश्चित माहिती मिळू शकली नाहीये. त्या दोघांनी त्यांच्या नात्याच्या जाहीर कबुलीही दिली नाहीये.
आयुष संजीवन सोनी मराठीवरील 'बॉस माझी लाडाची' या मालिकेतून पदार्पण केलं. त्यानंतर झी मराठीवर त्याची आलेली '३६ गुणी जोडी' ही मालिकाही खूप गाजली. तर चिन्मयीने 'नवरी मिळे नवऱ्याला' या मालिकेत काम केलं होतं त्यानंतर तिने 'वागले कि दुनिया' या मालिकेत काम करू लागली. यात तिने साकारलेली सखी ही भूमिका खूप गाजली. या मालिकेत तिच्याबरोबर सुमीत राघवन, परिवा प्रणती, भारती आचरेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.