
AISHWARYA RAI
ESAKAL
आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावणारी लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने अभिनेता अभिषेक बच्चन याच्याशी लग्नगाठ बांधली. मात्र तेव्हा अनेकांनी हे नातं टिकणार नाही असं म्हटलं होतं. आता गेल्या वर्षभरापासून अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्यात दुरावा आल्याचं बोललं गेलं. त्याचं कारण जया बच्चन आणि अभिषेकची बहीण श्वेता नंदा आहे असं म्हटलं जातं. मात्र त्यानंतर ते दोघेही अनेक कार्यक्रमात एकत्र दिसले. त्या चर्चांवर त्या दोघांनीही प्रतिक्रिया दिली नाही. आता लोकप्रिय दिग्दर्शकाने ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या त्या वागण्याची दुसरी बाजू सांगितली आहे.