
बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. आता आमिरने एक मोठी घोषणा केली आहे. त्याचा 'सितारे जमीन पर हा चित्रपट 1 ऑगस्ट पासून यूट्यूब वर अवघ्या शंभर रुपयात पाहता येणार आहे. 'आमिर खान टॉकीज' यूट्यूब चैनल वर चित्रपट पाहण्याची सुविधा आहे. 1 ऑगस्ट पासून यूट्यूबवर हा चित्रपट पाहता येणार आहे. युट्युब सोबत आमिर खानची पार्टनरशिप झाली असून आता त्याचे पुढील चित्रपटही ओटीटीवर न येता थेट युट्युबवर दाखवले जाणार आहेत. त्यातील पहिला चित्रपट म्हणजे 'सितारे जमीन पर.'