
Tulja Bhavani Serial: 'तुळजा भवानी' ही मालिका कलर्स वाहिनीवरील सर्वाधिक लोकप्रिय मालिकेतील एक आहे. छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये या मालिकेच्या प्रेक्षकांची संख्याही बरीच मोठी आहे. अखंड महाराष्ट्राची कुलदेवता असलेली तुळजाभवानी माता हिचं महात्म्य सांगणारी ही मालिका प्रेक्षकांची आवडती आहे. या मालिकेत सध्या आई तुळजाभवानीने जगदंबा म्हणून अवतार घेतला आहे. मालिकेत बालकलाकार विहा सद्गिर ही छोट्या जगदंबेच्या भूमिकेत दिसतेय. तिचा अभिनय उत्तम आहे. आता या मालिकेच्या दिग्दर्शकाने विहासोबतच्या डबिंगचा एक व्हिडिओ शेअर केलाय.