

prajakta-gaikwad-wedding
ESAKAL
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलं. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील तिचा अभिनय चाहत्यांना भावला. आता खऱ्या आयुष्यातही प्राजक्ता लग्नबंधनात अडकलीये. तिने शंभूराज खुटवड याच्यासोबत विवाह केला आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांमध्ये प्रचंड व्हायरल झाले. मोठ्या थाटामाटात त्यांचा विवाह पार पडला. प्राजक्ताच्या रॉयल लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली. आतापर्यंत पाहिलेली सगळ्यात सुंदर नवरी असं म्हणत चाहत्यांनी तिचं कौतुक केलं. मात्र अशातच तिच्या ब्लॉऊजचीही चाहत्यांमध्ये चर्चा रंगलीय.