
छोट्या पडद्यावर नुकतीच 'वीण दोघातली ही तुटेना' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता सुबोध भावे मुख्य भूमिकेत झळकताना दिसतायत. झी मराठीवरील ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय. अनेक मालिकांच्या गर्दीत आता नव्याने सुरू झालेली ही मालिका प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरलीये. यात सुबोध समोरची तर तेजश्री स्वानंदीची भूमिका साकारतेय. मात्र जेव्हा या मालिकेचा प्रोमो आला होता तेव्हा सुबोधच्या पत्नीने तो पाहून तेजश्रीला मेसेज केला होता.