
Entertainment News : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन याच्या 'पुष्पा २' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसर प्रचंड कमाई केली. १५०० कोटींची कमाई करत या चित्रपटाने सगळ्यांचे रेकॉर्ड तोडले. मात्र चित्रपटाला गालबोट लागलं ते या चित्रपटाच्या प्रिमिअरच्या दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीने. हैदराबाद येथील एका थिएटरमध्ये ही घटना घडली होती. आता त्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेत. यातील दृश्य पाहून सगळ्यांनाच धडकी भरली आहे.