
THARLA TAR MAG
ESAKAL
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' मध्ये नवनवीन ट्विस्ट येत आहेत. मधुभाऊंची सुटका केल्यानंतर अर्जुन सायली आणि प्रिया यांचं खरं गाठोडं शोधून घरी आणतो. मात्र त्यातल्या वस्तू पाहूनही सायलीला फारसं काही आठवत नाही. प्रिया प्रतिमाला त्रास देत असते त्यामुळे सायली घराबाहेर जाते. मात्र रविराज तिला परत घरी आणतो. हे पाहून प्रिया चांगलीच संतापतो. त्यानंतर मात्र प्रिया सुभेदारांच्या घरात पुन्हा कसं शिरायचं याचा प्लॅन बनवते. यात ती पुन्हा एकदा प्यादा म्हणून अश्विनचा वापर करते. पाहूया आजच्या म्हणजेच १० ऑक्टोबरच्या भागात 'ठरलं तर मग' मध्ये काय घडणार.