
भाऊबंदकी आणि अन्यायाविरुद्ध बंड पुकारलेल्या तांबव्याच्या विष्णू बाळा पाटलांचा थरारक जीवनपट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येणार आहे. १९५२-५३ च्या दरम्यान घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. यात अभिनेते सयाजी शिंदे स्वतः विष्णू बाळांची भूमिका साकारणार असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. मात्र साताऱ्याच्या या पैलवान गड्याला हातात शस्त्र का घ्यावं लागलं? असं नेमकं काय घडलेलं?