

yadakadachit natak
ESAKAL
मराठी नाट्यसृष्टीने आजवर अनेक दमदार नाटकं पाहिली. 'यदा- कदाचित' हे नाट्यसृष्टीवरील प्रचंड गाजलेलं नाटक. या नाटकाने जितकी वाहवा मिळवली तितकाच या नाटकाला विरोध झाला. हे नाटक लोकप्रिय दिग्दर्शक संतोष पवार यांनी दिग्दर्शित केलंय. नुकत्याच झालेल्या लोकसत्ताच्या लिटफेस्टमध्ये संतोष यांनी या नाटकाचा किस्सा सांगितला जेव्हा या नाटकाला विरोध झालेला आणि आनंद दिघे हे नाटक पाहायला आले. त्यांनी या नाटकाला मदत केली होती.