

SALMAN KHAN NETWORTH
ESAKAL
अभिनयाच्या क्षेत्रात कामाची कोणतीही शाश्वती नसते, म्हणूनच अनेक अभिनेते साइड बिझनेस म्हणून काही ना काही तरी करत असतात. बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खान देखील याला अपवाद नाही. उद्या २७ डिसेंबर रोजी सलमान खान आपला ६० वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने चाहत्यांमध्ये त्याच्या संपत्तीबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, सलमान खानची एकूण संपत्ती सध्या ३००० कोटी रुपयांच्या घरात आहे. मात्र गेले अनेक वर्ष सलमान केवळ वर्षातून १ चित्रपट करतोय. त्यातही ते चित्रपट फ्लॉप ठरतायत. अशात सलमानची कमाई नेमकी होते कुठून?