

vilasrao deshmukh and genelia deshmukh
ESAKAL
मराठी आणि बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा झेंडा रोवणारा लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. जिनिलियाने 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. याच सिनेमादरम्यान ते प्रेमात पडले आणि त्यांनी काही वर्ष डेटिंग केल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. जिनिलिया देशमुखांची सून झाली. जिनिलिया आणि रितेश यांचा 'वेड' चित्रपट चांगलाच गाजला. मात्र जिनिलिया आणि विलासराव देशमुख यांची पहिली भेट कशी झालेली, त्यांच्यात काय बोलणं झालेलं, त्यांनी जिनिलियाला सून होण्यासाठी कशी परवानगी दिली याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. रितेशने एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं होतं.