

laxmichya pavalanni end
ESAKAL
छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या अत्यंत आवडत्या असतात. ज्या मालिकांचा टीआरपी जास्त ती मालिका प्रेक्षकांची आवडती. मात्र गेल्या काही महिन्यात स्टार प्रवाहवर काही नवीन मालिका पाहायला मिळाल्या. काही दिवसांपूर्वीच स्टार प्रवाहने दोन नव्या मालिकांची घोषणा केली. 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' आणि 'वचन दिले तू मला' या दोन नव्या मालिकांपैकी 'वचन दिले तू मला ही मालिका रात्री ९. ३० वाजता दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे आता 'लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेला निरोप घ्यावा लागणार आहे. आता या मालिकेचा शेवट कसा असणार आहे हेदेखील समोर आलंय.