
Bollywood News : बॉलिवूडचे हि मॅन धर्मेंद्र सध्या अभिनयापासून दूर असून सोशल मीडियावर अनेक गोष्टी शेअर करत असतात. अनेक जुन्या आठवणी ते सोशल मीडियावर त्यांच्या फॅन्ससोबत शेअर करतात. नुकतीच त्यांनी ज्येष्ठ दिवंगत अभिनेते अशोक कुमार यांच्याबरोबरचा एक जुना फोटो शेअर केला. या फोटोमध्ये दादामुनी धर्मेंद्र यांना 100 रुपयांच्या नोटेवर स्वाक्षरी देताना दिसत आहेत.