Bollywood News : ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. किडनी फेल्युअरमुळे आज 25 ऑक्टोबरला दुपारी 2:30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. यावेळी त्यांचं वय 74 वर्षं होतं..सतीश यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये काम केलं. त्यातील त्यांची एक गाजलेली व्यक्तिरेखा म्हणजे में हूँ ना या सिनेमातील प्रोफेसर माधव रसाई. ही व्यक्तिरेखा विद्यार्थ्यांवर चिडचिड करणाऱ्या आणि बोलताना सतत थुंकी उडवणाऱ्या व्यक्तीची होती. या सिनेमाचा प्रसंग त्यांनी एका मुलाखतीत सांगितला होता. .टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते की,"मला मी थुंकणारा कोब्रा असल्यासारखं वाटलं होतं. शाहरुखने मला ही भूमिका स्वीकारण्यासाठी तयार केलं होतं. शॉट आधी मी पाणी प्यायचो त्यामुळे मला सीन करणं सोपं जायचं. पण एकदा मी शाहूंर्खवर खूप चिडलो होतो."."शाहरुखसोबत माझा एक सीन होता आणि त्यात मी त्याच्यावर बोलताना थुंकी उडवतो. तो सीन शूट करताना शाहरुख सतत हसत होता. त्यामुळे आम्ही त्याचे आठ रिटेक केले. पण शाहरुखचं हसू आवरत नव्हतं. शेवटी मी भडकलो आणि जाहीर केलं की मी पुन्हा हा शॉट शूट करणार नाही."."त्यानंतर पुन्हा शूटिंगला सुरुवात केली आणि तरीही शाहरुखला हसू आवरलं नाही, शेवटी तिथे झाएदचा क्लोजअप लावला आहे. त्यानंतर बऱ्याच इतर शूटिंगमधेही मी समोरच्यावर थुंकलो आहे पण लोकांनी मला सावरून घेतलं आहे.".भारतीय सिनेसृष्टीला आणखी एक धक्का ! अभिनेते सतीश शाह यांचं निधन.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.