
Bollywood Entertainment News : बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीमधील दमदार आणि तितक्याच सुंदर अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या अभिनेत्रीने अनेक भूमिका गाजवल्या. त्यांनी साकारलेली प्रत्येक पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. नुकतंच ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये स्मिता यांच्याविषयी एक खास किस्सा शेअर केला.