
Bollywood News : बॉलिवूडमधील दमदार अभिनेते म्हणजे ऋषी कपूर. ते जितके उत्तम अभिनेते होते पण तितकेच त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध होते. बऱ्याचदा त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्यही केली होती. तर सेटवरही कोणत्या सिनियर कलाकाराला त्याची चूक दाखवून देण्यात त्यांनी मागे पुढे बघितलं नाही. पण एका मराठी अभिनेत्रीने एका सीनच्या शूटिंगदरम्यान त्यांना तब्बल आठवेळा कानाखाली मारली.