Sanjeev Kumar : संजीव यांनी वाचवला होता अमिताभ आणि शत्रुघ्न सिन्हा यांचा संसार ; लग्न न करण्यामागे होतं 'हे' कारण

When Sanjeev Kumar Saved his best friends marriages : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते संजीव कुमार यांनी त्यांचे जवळचे मित्र अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांचा संसार वाचवला होता.
Sanjeev Kumar saved his friends
Sanjeev Kumar saved his friendsEsakal

Sanjeev Kumar Memory : आज बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते संजीव कुमार यांची पुण्यतिथी आहे. उत्तम अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या संजीव यांच्या अनेक भूमिका गाजल्या. आपल्या छोट्याशा कारकिर्दीमध्ये त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिका गाजल्या होत्या. शोलेमधील ठाकूर, दोन खिलोनामधील मतिमंद व्यक्ती आणि कोशिश सिनेमातील मूकबधिर व्यक्ती अशा भूमिका त्यांनी साकारल्या होत्या.

शत्रुघ्न यांची मदत

पण तुम्हाला माहितीये का ? संजीव यांनी त्यांच्या दोन खास मित्रांचे संसार वाचवले आहेत. अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी संजीव यांचे खास मित्र होते. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, शत्रुघ्न सिन्हा यांनी एकदा एका मुलाखतीत पूनमशी लग्न केल्यानंतर त्यांना पैशांची नितांत गरज असल्याचे नमूद केलं होतं. त्यांच्यासाठी तो खूप कठीण टप्पा होता आणि आर्थिक अडचणींमुळे त्यांचं लग्नही अतिशय साधेपणाने पार पडलं होतं. या काळात त्यांना पैशांची नितांत गरज होती. जेव्हा शत्रुघ्न यांना कुणीही मदत करायला तयार नव्हतं तेव्हा संजीव यांनी त्यांना दहा लाख रुपयांची मदत केली होती. जेव्हा त्यांना पैसे परत करायला जमतील तेव्हाच द्यावेत असंही त्यांनी सांगितलं होतं असं शत्रुघ्न यांनी या मुलाखतीत सांगितलं.

अमिताभ यांचा संसार वाचवला

संजीव यांच्यावर हनिफ झवेरी आणि सुमंत बत्रा यांनी लिहिलेल्या पुस्तकात अशी आठवण लिहिलं आहे कि जेव्हा अमिताभ आणि जया बच्चन यांच्या संसारात खूप अडचणी येत होत्या. एका वाईट काळातून त्यांचं नातं जात होतं तेव्हा संजीव यांनी मध्यस्थाची भूमिका निभावत त्यांचं नातं वाचवलं होतं.

Sanjeev Kumar saved his friends
Sonakshi Sinha : "आज मला त्यांची खूप आठवण येतेय..." ; लग्नानंतर पहिल्यांदाच सोनाक्षीची आई-वडिलांसाठी इमोशनल पोस्ट

म्हणून, केलं नाही लग्न

संजीव हे तरुण असताना एका मुस्लिम मुलीच्या प्रेमात पडले होते पण त्यांच्या आईचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. त्यांना मुस्लिम धर्माची मुलगी सून घरात नको होती. त्यामुळे त्यांचं ते नातं मोडलं. पुढे शबाना आझमी यांच्याही ते प्रेमात पडले होते पण आईची इच्छा नसल्यामुळे त्यांनी ते नातं पुढे नेलं नाही. त्यामुळे संजीव आयुष्यभर अविवाहित राहिले.

Sanjeev Kumar saved his friends
Amitabh & Rekha : अमिताभ- रेखा यांचा सिलसिला आता छोट्या पडद्यावर ; टेलिव्हिजनवरील 'ही' लोकप्रिय जोडी दिसणार मुख्य भूमिकेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com