Anant Ambani - Radhika Merchant Wedding : "२९ रुपयांचा रिचार्ज जस्टिन बीबरच्या खिशात ?" मराठी अभिनेत्री अंबानी लग्नसोहळ्यावर थेट बोलली

Marathi Actress Talks About Anant & Radhika Wedding : मराठी अभिनेत्रीने अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्याबद्दल तिचं मत व्यक्त केलं.
Anant & Radhika Wedding
Anant & Radhika WeddingEsakal

Anant & Radhika : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचं लग्न हा सध्या सगळ्यात चर्चेत असलेला विषय ठरला आहे. अगदी प्री वेडिंग कार्यक्रमापासून ते आता लग्नसोहळ्याचे विविध कार्यक्रम या सगळ्याच गोष्टी मोठ्या थाटामाटात अंबानी स्टाईलने सुरु आहेत. यातच संगीत सोहळ्यातली आंतरराष्ट्रीय गायक जस्टिन बिबरची उपस्थिती लक्षवेधी ठरली. अनंत आणि राधिकाच्या संगीत कार्यक्रमात थेट जस्टिन बिबरने हजेरी लावली. एवढच नाही तर या संगीत सोहळ्यात जस्टिनचा खास परफॉर्मन्स पाहायला मिळाला. ज्या गायकाच्या गाण्यांची, कॉन्सर्टची जगभरात चर्चा असते असा लोकप्रिय स्टार अंबानींच्या संगीत समारंभात गातो, हे लक्ष वेधून घेणारं ठरलं. यातच जस्टिनने बिबरने या संगीत सोहळ्यात गाण्यासाठी किती पैसे घेतले याविषयी जोरदार चर्चा सुरु आहे. या संगीत सोहळ्यासाठी जस्टिन बिबरने १० मिलीयन म्हणजेच तब्बल ८४ कोटी रुपये घेतल्याचं म्हटलं जातय. यावरुनच सोशल मिडीयावर मीम्सचा पाऊस सुरु झालाय.

Anant & Radhika Wedding
Anant & Radhika Wedding : अनंत-राधिकाच्या हळदीत बॉलिवूड सेलिब्रिटीजची धमाल ; रणवीरचा अवतार बघून नेटकरी चकित

मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक आणि सर्वेसर्वा आहेत. त्यामुळे या गोष्टीचा जस्टिन बीबरच्या ८४ कोटी चार्ज करण्याशी संबंध लावत सोशल मिडीयावर विनोदी मीम्स बनवण्यात आलेत. यातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने देखील विनोदी अंदाजात यावर मीम व्हिडीओ बनवलाय. अभिनेत्री गौरी कुलकर्णीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेयर केलाय. या व्हिडीओत ती उल्लेख करते की, "मी माझे 29 रुपयांचे रिचार्ज जस्टिन्सच्या खिशात जात असल्याचे पाहताना." या व्हिडीओत कॉमेडी हावभाव करत गौरीने जस्टिन आणि मुकेश अंबानी यांचा फोटो देखील जोडलाय. गौरीच्या या हटके मीम व्हिडीओने सगळ्यांचच लक्ष वेधून घेतलय.

'आई कुठे काय करते' या मालिकेत अभिनेत्री गौरी कुलकर्णी झळकली होती. या मालिकेतील कामामुळे तिचं कौतुक झालं होतं तर त्या भूमिकेमुळे ती लोकप्रिय झाली. फक्त गौरीच नाही तर जस्टिनचे अंबानींच्या संगीत कार्यक्रमातील व्हिडीओ पाहुन अनेकांनी रिचार्जचा उल्लेख करत मीम्स बनवले आहेत. जस्टिनच्या पेहरावाबद्दलही विविध मीम्स समोर येताना दिसत आहेत. अमाप संपत्ती असलेल्या अंबानींच्या कार्यक्रमात कोटींच्या घरात पैसे खर्च करून आंतरराष्ट्रीय कलाकारांना बोलावलं जातं. हे पाहुन सामान्य नागरीक मात्र सोशल मिडीयाच्या माध्यमातून अशा मीम्सच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतात.

Anant & Radhika Wedding
Anant-Radhika Haldi Ceremony: मुलाच्या हळदीला चर्चा फक्त वरमाईची; शाही हैदराबादी सूटमध्ये निता अंबानींचा रॉयल अंदाज एकदा बघाच..!

अनंत आणि राधिकाच्या प्री वेडिंग कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहानाला देखील आमंत्रित करण्यात आलं होतं. रिहानाचा खास परफॉर्मन्स यावेळी पाहायला मिळाला होता. यासाठी रिहानाने तब्बल ७४ कोटी एवढे रुपये घेतले होते.

Anant & Radhika Wedding
Anant & Radhika Sangeet : अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्याला सलमानचा धमाकेदार परफॉर्मन्स ; स्टारकिड्सनीही केला डान्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com