
yami gautam
ESAKAL
बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतम नेहमीच आपल्या साधेपणासाठी आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखली जाते. चित्रपटसृष्टीतील आकर्षक दिसण्याचा दबाव, नवनवीन ट्रेंड्स आणि कृत्रिम बदलांचा मोह असूनही तिने स्वतःसाठी वेगळी वाट निवडली आहे. अलीकडील एका मुलाखतीत तिने तिच्या आयुष्यातील एक खास अनुभव शेअर केला, ज्यातून तिच्या ठाम भूमिकेची पुन्हा एकदा जाणीव झाली. यामीने सांगितले, की एका ज्येष्ठ मेकअप आर्टिस्टने तिला भुवयांचा आकार बदलण्याचा सल्ला दिला होता.