मकरंद अनासपुरेंच्या 'अगडबम' चित्रपटातली नाजुका आठवतेय? १६ वर्षात इतकी बदलली, आता काय करते अभिनेत्री?

Agadbam Movie Najuka Actress: एका चित्रपटातून रातोरात स्टार झालेली 'अगडबम' चित्रपटातली मुख्य अभिनेत्री आता काय करते? १६ वर्षात तिच्यात प्रचंड बदल झालाय.
AGADBAM MOVIE TRUPTI BHOIR

AGADBAM MOVIE TRUPTI BHOIR

ESAKAL

Updated on

मराठी चित्रपट सृष्टीत असे अनेक कलाकार आहेत जे वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येतात आणि प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करतात. हे कलाकार कायमचे प्रेक्षकांच्या डोक्यात कोरले जातात. त्या एकाच चित्रपटातून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळते आणि तीच त्यांची ओळख बनते. असंच एक प्रचंड गाजलेलं पात्र म्हणजे 'अगडबम' चित्रपटातील नाजूका हे पात्र. या चित्रपटात अभिनेत्री तृप्ती भोईर हिने हे पात्र साकारलं होतं. लोकप्रिय अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यासोबत दिसणारी ही जाडजूड अभिनेत्री आता काय करते ठाऊक आहे का?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com