

vicky kaushal katrina kaif son
ESAKAL
बॉलिवूडचे पॉवर कपल असलेले लोकप्रिय कलाकार म्हणजे अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ रोजी लग्नगाठ बांधली होती. त्यांचं लग्न हे चाहत्यांसाठी आश्चर्याचा धक्का होतं. त्यानंतर नोव्हेंबर २०२५ मध्ये त्यांनी त्यांच्या पहिल्या मुलाचं या जगात स्वागत केलं. त्यांनी आपल्या मुलाचं नाव विहान ठेवलं. कतरिना आणि विकी यांनी आपल्या मुलाचा चेहरा प्रेक्षकांना दाखवलेला नाही. मात्र पापाराझींना मुलाचा चेहरा दाखवत त्यांनी त्याचे फोटो न काढण्याची विनंती केली होती. त्यामुळे विहानबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक असतात. आता अखेर विहान नेमका कुणासारखा दिसतो त्याबद्दल त्याच्या आजोबांनीच सांगितलं आहे.