
अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर राहिलेली दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणावर पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली आहे. तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत शिवसेना (यूबीटी) आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह इतर काही महत्त्वाच्या व्यक्तींवर गंभीर आरोप केले आहेत.