DNYANADA RAMTIRTHKAR
ESAKAL
Premier
कोण आहे ज्ञानदा रामतीर्थकरचा होणारा नवरा? 'या' क्षेत्रात करतो काम; ६ वर्षांपूर्वीचा फोटो होतोय व्हायरल
DNYANADA RAMTIRTHKAR HUSBAND:'लग्नानंतर होईलच प्रेम' मधील काव्या आता खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकणार आहे. तिच्या नवर्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
या वर्षी मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी लग्नगाठ बांधली. प्राजक्ता गायकवाड- शंभूराज खुटवड, सोहम बांदेकर- पूजा बिरारी, सुरज चव्हाण यांसारख्या अनेक कलाकारांनी यावर्षी दोनाचे चार हात केले. खासकरून छोट्या पडद्यावरील अनेक कलाकार यावर्षी बोहोल्यावर चढले. मात्र अजूनही मराठी कलाकारांची लगीनघाई संपलेली नाही. नुकतीच 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेतील काव्याने प्रेक्षकांना गुडन्यूज दिलीये. काव्या म्हणजेच अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर लवकरच बोहोल्यावर चढणार आहे. तिने गुपचूप साखरपुडादेखील केलाय. तिचा होणारा नवरा कोण आहे हे जाणून घेण्यासाठी आता प्रेक्षक उत्सुक आहेत.

