
बॉलिवूड अभिनेता अजय देवगन याच्या 'रेड २' ची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. प्रेक्षक या चित्रपटासाठी प्रचंड उत्सुक होते. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलंय. चित्रपट अतिशय उत्तम झाल्याचं सांगत प्रत्येकजण चित्रपटाची माउथ पब्लिसिटी करतोय. 'रेड २' हा २०१८ साली आलेल्या 'रेड'चा पुढचा भाग आहे. 'रेड'ला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला होता. चित्रपटाचा पहिला भाग चांगलाच गाजला होता. या भागात अजयच्या विरोधात रितेश देशमुख दिसतोय. मात्र या दोघांव्यक्तिरिक्त आणखी एका अभिनेत्रीवर प्रेक्षकांच्या नजरा खिळल्या आहेत.