

ajit pawar
esakal
महाराष्ट्रात चार दिवसांपूर्वी सगळ्यांना हादरवणारी घटना घडली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. त्यांची कामं आठवून त्यांचे समर्थक प्रसंगी विरोधकही भावुक झाले. अशातच आता अजित दादांच्या निधनानंतर त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात अजित पवार त्यांच्या बायोपिकबद्दल बोलतायत. सोबतच त्यांची भूमिका कुणी करावी याबद्दलही सांगतायत.