

aamir khan painjan
esakal
आपल्या अभिनयाने एक बेंचमार्क सेट करणारा लोकप्रिय अभिनेता आमिर खान त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या वैयक्तिक गोष्टींमुळेही चर्चेत असतो. नुकतंच आमिरने तिसरं लग्न केलं. त्याने गौरी स्प्रॅटसोबत लग्न करून आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात केलीये. गौरी आधीपासून एका मुलाची आई आहे. तर आमिरचीही आधी दोन लग्न झालीयेत. तो तीन मुलांचा बाबा आहे. तो त्याच्या तिसऱ्या लग्नामुळे चांगलाच चर्चेत होता. मात्र आता तो चर्चेत असण्याचं कारण वेगळं आहे. आपल्या तिसऱ्या लग्नात आमिरने चक्क पायात पैंजण घातलं होतं जे आता नेटकऱ्यांच्या उत्सुकतेचा विषय ठरलंय.