

DINING WITH THE KAPOORS ALIA BHATT
esakal
बॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित कुटुंबांपैकी एक असलेल्या कपूर घराण्याच्या जीवनशैलीवर, त्यांच्या खाण्यापिण्याच्या आवडींवर, कौटुंबिक परंपरांवर आणि जुन्या आठवणींवर आधारित 'डाइनिंग विद द कपूर्स' (Dining with the Kapoors) या नवीन डॉक्युमेंट्रीच्या प्रीमियरची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या डॉक्युमेंट्रीचा फर्स्ट लुक आल्यापासून ते ट्रेलर रिलीज होईपर्यंत एका गोष्टीची सर्वाधिक चर्चा झाली: कपूर कुटुंबाच्या या संपूर्ण कथानकात घरातील सून आलिया भट्ट दिसत का नाहीये?