

AMRUTA SINGH
ESAKAL
बॉलिवूडमध्ये आजवर अनेक घटस्फोट झाले. प्रत्येक घटस्फोटाच्या पोटगीचीही जोरदार चर्चा झाली. मात्र बॉलिवूडमधला सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेला घटस्फोट म्हणजे सैफ अली खान आणि अमृता सिंह यांचा. त्यांना वेगळं होऊन आज बरीच वर्ष झाली. मात्र आजही त्यांच्या घटस्फोटाबद्दल बोललं जातं. घटस्फोटानंतर अभिनेता सैफ अली खान याने दुसरं लग्न करत अभिनेत्री करीना कपूर हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. मात्र अमृताने दुसरं लग्न केलं नाही. याचं कारण अभिनेत्रीने स्वतः सांगितलं होतं.