

anushka virat
esakal
लोकप्रिय भारतीय क्रिकेटर विराट कोहली आणि त्याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दोघेही गेल्या काही वर्षांपासून आपल्या दोन्ही मुलांसह लंडनमध्ये राहतायत. अनेकदा क्रिकेट सामन्यांसाठी आणि अनेक कार्यक्रमांसाठी ते दोघे भारतात येताना दिसतात. त्यांचे चाहते अनेक आहेत. मात्र त्यांनी मुलांचं संगोपन करण्यासाठी भारतात न राहता लंडनला जाण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती आणि डॉक्टर श्रीराम नेने यांनी त्यांच्या या कृतीमागचं खरं कारण सांगितलंय.