कुकू कोहलींशी लग्न केल्यावरही अरुणा इराणी राहिल्या निपुत्रिक; का होऊ दिलं नाही स्वतःचं मूल? हे होतं कारण

WHY ARUNA IRANI DON'T HAVE KIDS: लोकप्रिय बॉलिवूड फिल्ममेकर कुकू कोहली यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झालं. मात्र अरुणा त्यांच्याशी लग्न करूनही अपत्याशिवाय राहिल्या. का होऊ दिलं नाही मूल?
aruna irani

aruna irani

ESAKAL

Updated on

लोकप्रिय दिग्दर्शक, निर्माते, एडिटर कुकू कोहली यांचं २५ ऑगस्ट २०२६ रोजी कार्डियाक अरेस्टने निधन झालं. अभिनेत्री अरुणा इराणी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र अरुणा या त्यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. लग्न झाल्यावर कोणतीही स्त्री मुलांचा विचार करते. मात्र अरुणा यांनी याउलट जात मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला होता. ‘बेटा’, ‘फर्ज’, ‘रॉकी’, ‘बॉबी’ व ‘लव्ह स्टोरी’ यांसारखे चित्रपट गाजवणाऱ्या अरुणा आयुष्यभर निपुत्रिक राहिल्या. त्यामागचं कारण त्यांनी स्वतः सांगितलं होतं. आपण जे सहन करतोय ते आपल्या मुलाला सहन करावं लागू नये यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलेला असं त्या म्हणालेल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com