
ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर ही जोडी मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. त्यांनी ९० च्या दशकात अनेक चित्रपटात काम केलं. ऐश्वर्या आणि अविनाश यांनी त्यांच्या अभिनयाने सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं. ते दोघे सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतात. ते त्यांचे व्हिडिओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात. चाहते नेहमीच त्यांच्या एनर्जीकडे पाहून चकीत होतात. मात्र अविनाश हे ऐश्वर्या यांच्याहून ८ वर्ष मोठे आहेत. त्यांचा प्रेम विवाह होता. मात्र अविनाश यांनी नाही तर ऐश्वर्या यांनी अविनाश यांना प्रपोज केलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्या यांनी अविनाश यांच्याशी लग्न करण्याचं खरं कारण सांगितलं आहे.