प्रचंड दारू प्यायलेले राजेश खन्ना रात्री ३ वाजता टेरेसवर गेले आणि... तो आवाज ऐकून डिंपलही धावत गेल्या, सांगितला तो किस्सा

RAJESH KHANNA DIMPLE KAPADIA DIVORCE REASON: राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांचं प्रेम आणि वेगळं होणं दोन्ही खूप गाजलं. मात्र ते दोघे वेगळे का झालेले यामागे अनेक कारणं सांगितली जातात.
DIMPLE KAPADIA

DIMPLE KAPADIA

ESAKAL

Updated on

बॉलिवूडचे सुपरस्टार राजेश खन्ना यांनी एक काळ गाजवला. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते तासनतास रांगा लावून उभे राहायचे. त्यांचे चित्रपट जितके गाजले तितकंच त्यांचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेत राहील. त्यांच्याशी लग्न करायला तर अनेक तरुणी उत्सुक होत्या. मात्र त्यांनी १६ वर्षांच्या डिंपल कपाडिया यांच्याशी लग्नगाठ बांधली. तेव्हा राजेश खन्ना ३१ वर्षांचे होते. त्यांच्या वयात खूप जास्त फरक होता. मात्र प्रेमात असलेल्या डिंपल यांना ते तेव्हा जाणवलं नाही. राजेश खन्ना यांनी लग्नानंतर डिंपल यांना काम करण्यास मनाई केली. पुढे त्यांच्या आयष्यात असे अनेक किस्से घडले ज्यामुळे डिंपल यांनी पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यातली एक घटना राजेश खन्ना यांनी स्वतः सांगितली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com