लग्न करून मराठी कुटुंबात आली, महिन्याभरानंतर सकाळी उठून रडू लागली जिनिलिया; रितेशही घाबरला; आता सांगितलं कारण

GENELIA DESHMUKH CRIED IN IN LAW'S HOUSE : लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया देशमुख हिने एका मुलाखतीत लग्नानंतर घडलेला तो प्रसंग सांगितला जेव्हा ती अचानक रडू लागलेली.
GENELIA DESHMUKH

GENELIA DESHMUKH

ESAKAL

Updated on

GENELIA DESHMUKH BIRTHDAY: आधी बॉलिवूड आणि नंतर मराठी इंडस्ट्री गाजवलेली लोकप्रिय अभिनेत्री जिनिलिया प्रेक्षकांची लाडकी आहे. अभिनेता रितेश देशमुखसोबत लग्न केल्यानंतर ती मराठी संस्कृतीसोबत इतकी छान जोडली गेलीये की ती पूर्वीपासूनच मराठी मुलगी असल्यासारखी वाटते. मात्र तिने लग्नानंतर खास सगळं शिकून घेतलं. रितेश आणि जिनिलिया यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला होता. मात्र लग्न केल्यानंतर महिन्याभरातच जिनिलिया अचानक एकेदिवशी सकाळी रडू लागली होती. ती का रडतेय हे ऐकून रितेशही चकीत झाला होता. मात्र परिस्थितीचं गांभीर्य समजून घेत त्याने सगळं व्यवस्थित हाताळलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com