
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'रेड २' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. एक प्रामाणिक आयकर विभाग अधिकारी अमेय पटनायक याच्या धडाकेबाज भूमिकेत अजय देवगन दिसतोय. तर रितेश देशमुख एका भ्रष्ट नेत्याच्या भूमिकेत दिसतोय. 'रेड' या चित्रपटात देखील अजय मुख्य भूमिकेत होता. तर अभिनेत्री इलियाना डिक्रूजही त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत होती. मात्र 'रेड २' मध्ये इलियानाच्या जागी अभिनेत्री वाणी कपूर दिसतेय. इलियानालाच दुसऱ्या भागात का घेतलं नाही यावरुन सोशल मीडियावर अनेकांनी प्रश्न विचारले होते. आता सिनेमाचे दिग्दर्शक राज कुमार गुप्ता यांनी यावर उत्तर दिलं आहे.