

GIRIJA OAK
ESAKAL
सोशल मीडियावर सध्या एका सुंदर अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होतोय. त्यात ती निळ्या रंगाच्या साडीमध्ये दिसतेय. ट्विटरवर हा फोटो चांगलाच व्हायरल झालाय. हा फोटो पाहून प्रेक्षक तिच्यावर फिदा झालेत. ही अभिनेत्री आहे मराठमोळी गिरीजा ओक. लोकप्रिय मराठी अभिनेते गिरीश ओक यांची मुलगी असलेली गिरीजा गेले काही दिवस ट्विटरवर ट्रेंडिग आहे. सगळे तिचे फोटो शेअर करत आहेत आणि तिच्याबद्दल विचारणा करत आहेत. ही मुलगी कोण आहे आणि हा फोटो कुठला आहे असे प्रश्न नेटकरी विचारताना दिसतायत. ती नॅशनल क्रश बनलीये. मात्र तिने असं केलं तरी काय ज्यामुळे ती इतकी व्हायरल झालीये?