
लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या प्रत्येक चित्रपटाची जोरदार चर्चा होते. तसाच त्यांचा 'झापूक झुपूक' हा चित्रपटही सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे सूरज चव्हाण. रीलस्टार असलेला सूरज 'बिग बॉस मराठी' मध्ये आला. बघता बघता त्याने सगळ्यांची मनं जिंकली. आणि शेवटी ट्रॉफी आपल्या नावे करून गेला. त्यानंतर त्याला केदार शिंदे यांनी त्यांच्या सिनेमाची ऑफर दिली. मात्र सूरजचं शिक्षण पूर्ण न झाल्याने त्याला लिहिता-वाचता येत नाही. त्यामुळे चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याला स्क्रिप्ट, अभिनय या गोष्टी कशा समजावून सांगितल्या याबद्दल केदार यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.