

MEENAKSHI SHESHADRI ON MADHURI DIXIT
ESAKAL
बॉलिवूडमध्ये चित्रपटातून एखादा कलाकार रिप्लेस होणं हे काही नवीन नाही. कधीकधी यामागे चित्रपटाच्या भल्याचा विचार असतो. मात्र कधीकधी यामागे वैयक्तिक हेवेदावे कारणीभूत असतात. काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत आदित्य पांचोलीने आपल्याला 'तेजाब' चित्रपटातून काढल्याचा दावा केला होता. ‘तेजाब’ या ब्लॉकबस्टर चित्रपटासाठी आदित्यची निवड झाली होती. मात्र बोनी कपूर यांच्यामुळे त्याजागी अनिल कपूर यांना घेतलं गेलं. फक्त आदित्यचं नाही तर मीनाक्षी शेषाद्रीला देखील या चित्रपटातून रिप्लेस करण्यात आलेलं. इतकंच नाही तर तिला 'दामिनी' या चित्रपटातूनही काढून टाकलं होतं. मात्र तुम्हाला त्यामागचं कारण ठाऊक आहे का?