

mukta barve
esakal
मराठमोळी अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने 'मुंबई पुणे मुंबई', 'मंगलाष्टक वन्स मोअर', 'डबल सीट' यांसारख्या दमदार चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडली. गेली अनेक वर्ष मुक्ता सिनेसृष्टीत काम करतेय. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकतेय. तिच्या एक वेगळा असा प्रेक्षकवर्ग आहे. मराठी सिनेसृष्टीतील एक ताकदीची अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. मात्र मुक्ताचे चाहते एकाच गोष्टीची वाट पाहत आहेत ते म्हणजे अभिनेत्रीचं लग्न. मुक्त आता ४७ वर्षांची झालीये. मात्र ती अजूनही अविवाहीत आहे. एका मुलाखतीत तिने याबद्दल सांगितलंय.