

rekha marriage real truth
esakal
अभिनेत्री रेखा यांना कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. मात्र त्यांच्या चित्रपटांसोबतच त्यांचं वैयक्तिक आयुष्यही कायम चर्चेत राहिलं. त्यांच्या मैत्रीण आणि फॅशन डिझायनर असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री बीना रमानी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रेखा आणि मुकेश अग्रवाल यांच्याबद्दल भाष्य केलंय. बीना यांनी एएनआयला मुलाखत दिली. यात बोलताना त्या म्हणाल्या, 'रेखाचं अमिताभवर प्रेम होतं, पण अमिताभ विवाहित होते. त्यामुळे ते आपल्यावरील प्रेम जाहीरपणे कधीच स्वीकारणार नाही, खासकरून राजकारणात प्रवेश केल्यावर, असं रेखाला वाटलं.'