

rinku rajguru
esakal
मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. रिंकूने वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी कामाला सुरुवात केली. ती 'सैराट' मधून घराघरात पोहोचली. मात्र त्यानंतरही तिने अनेक उत्कृष्ट चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारल्या. मराठीसोबतच ती हिंदी वेब सीरिजमध्येही झळकली. लवकरच रिंकूचा 'आशा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्यानिमित्ताने दिलेल्या मुलाखतीत रिंकूने तिच्या आयुष्यात न आलेल्या फेजबद्दल सांगितलंय. तिच्या आयुष्यातली मिस झालेली लाइफ म्हणजे तिचं कॉलेज. रिंकूने आपण कॉलेज लाइफ कधीच एन्जॉय केलं नसल्याचं सांगितलं.